मुंबई: राज्यात सध्या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. अशातच समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी यांनी केलेले वादग्रस्त विधान चांगलेच चर्चेत आहे. ते म्हणाले की, “वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्यामुळे रस्ते जाम होतात. आम्ही रस्त्यावर दहा मिनिटे नमाज अदा केली, तर तक्रार दाखल केली जाते.” त्यांच्या या विधानामुळे केवळ वारकरीच नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे.
खरं तर, पालखी सोहळा हा एक अत्यंत श्रद्धेचा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला धार्मिक उत्सव आहे. हा सोहळा मुख्यतः संत तुकाराम महाराज (देहू) आणि संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) यांच्या पालख्यांद्वारे पंढरपूरच्या श्री विठोबाच्या दर्शनासाठी दरवर्षी आयोजित केला जातो. लाखो वारकरी असले, तरी व्यवस्थापन अत्यंत चोख आणि शिस्तबद्ध असते. हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर समता, भक्ती आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. याच पालखी सोहळ्याला उद्देशून अबू आझमींनी वादग्रस्त विधान केले.
“पालख्यांमुळे रस्ते जाम होतात. जेव्हा हिंदूंचे सण साजरे केले जातात, तेव्हा बिगरहिंदू लोक त्याचा निषेध करत नाहीत. मात्र, आम्ही नमाजपठण करतो, तेव्हा लगेच तक्रारी केल्या जातात. त्यांच्या या विधानामुळे समाजातून चांगलाच रोष व्यक्त होताना दिसत आहे.”