विदर्भातील रायबा इमानदार मराठी ;चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार - चित्रपटाच्या पोस्टरचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अनावरण

23 Jun 2025 14:31:50

नागपूर : प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि सामाजिक संदेश यांची सांगड घालणाऱ्या "रायबा इमानदार" या मराठी चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

विदर्भात अनेक मराठी चित्रपटाची निर्मिती होत आहेत, ज्यात व्यावसायिक आणि माहितीपटांचाही समावेश आहे.

त्यात आता नव्याने रायबा इमानदार या नव्या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या प्रसंगी चित्रपटाचे निर्माता व लेखक सचिन घोडे यांची उपस्थित होते.

कार्यक्रमाला माजी आमदार मलिकार्जुन रेड्डी, माजी जिल्हा परिषद सदस्या शुभांगी गायधने, संताजी समाजसेवा संस्था काटोल अध्यक्ष किशोर रेवतकर, छायाचित्र दिग्दर्शक पवन पिपरोदे, उपसरपंच शुभम हटवार, संकेत घोडे,हर्षाली घोडे,प्रीती तागडे, देवांशी आष्टनकर, अनवित घोडे अक्षद आष्टनकर, स्वीय सहायक -राजेश गोलर, देविदास लोणारे उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी चित्रपटातील कलावंत, चित्रपटाच्या संकल्पनेचे आणि सामाजिक दृष्टिकोनाचे कौतुक केले.

"रायबा इमानदार" हा चित्रपट राजकारणातील संघर्ष , नैतिक अधःपतन आणि त्यावरील उपाय यांचा वेध घेतो. एका सामान्य व्यक्तीच्या सत्य आणि न्यायासाठीच्या संघर्षाची ही कथा प्रेक्षकांना निश्चितच विचार करायला लावणारी आहे.सचिन घोडे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्या लेखणीची ताकद आणि दिग्दर्शनातील प्रामाणिक दृष्टिकोन लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

चित्रपट लवकरच महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून, "रायबा इमानदार" प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवेल असा विश्वास सर्व कलाकार आणि निर्मात्यांनी व्यक्त केला.

Powered By Sangraha 9.0