ठाण्याचे कवी गीतेश शिंदे यांच्या काव्यसंग्रहाला कविवर्य कृ. वि. निकुंब साहित्य पुरस्कार जाहीर!

22 Jun 2025 20:28:05

मुंबई, बेळगाव येथील वाडमय चर्चा मंडळातर्फे दिला जाणारा कविवर्य कृ. ब. निकुंब साहित्य पुरस्कार (काव्यसंग्रह) २०२३ या वर्षासाठी कवी, लेखक गीतेश गजानन शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. 'सीसीटीव्हीच्या गर्द छायेत' या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. सदर साहित्य पुरस्काराचा वितरण सोहळा सोमवार दि. २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता वरेरकर नाट्यसंघ, टिळकवाडी, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि ३००० रुपयांचा धनादेश असा आहे. तरी काव्यप्रेमींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0