केआयआयटी (KIIT) ला मोठा सन्मान! ओडिशामधील पहिले खासगी विद्यापीठ; QS रँकिंगमध्ये जागतिक ओळख

21 Jun 2025 15:57:11




भुवनेश्वर : केआयआयटी डिम्ड युनिव्हर्सिटी (KIIT Deemed to be University) ला QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये महत्वाचे स्थान मिळाले आहे. ओडिशामधील खासगी विद्यापीठांमध्ये किआयआयटी पहिल्या क्रमांकावर आहे. केआयआयटीला भारतातील खासगी उच्च शिक्षण संस्थांमध्ये ९ वा क्रमांक मिळाला आहे. याचबरोबर, जागतिक स्तरावरही या विद्यापीठाने आपली छाप सोडली आहे. QS च्या आशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये किआयआयटीला दक्षिण आशियामध्ये ५५ वा क्रमांक मिळाला आहे.


ही रँकिंग शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, रोजगाराच्या संधी, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या आणि पर्यावरणपूरक उपक्रम या आधारे ठरवण्यात येते. एकूण १ हजार ५०० विद्यापीठांचा या अहवालात समावेश होता. केआयआयटीचे संस्थापक डॉ. अच्युत सामंता म्हणाले, “हे यश आमच्या परिश्रमांचे फळ आहे. २१ वर्षांच्या कालावधीत आम्ही मोठे यश प्राप्त केले आहे. सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन.” केआयआयटी आणि किस (KISS) परिवारानेही डॉ. सामंत यांचे आभार मानले आहे. त्यांच्या दूरदृष्टीने ओडिशाचे नाव जागतिक शिक्षण नकाशावर झळकले आहे.
Powered By Sangraha 9.0