ट्रम्प-मुनीर भेटीवरुन इराणच्या संतापाचा भडका! पाकिस्तानला दिला कडक इशारा; "युद्धात उतरल्यास..."

21 Jun 2025 14:38:56

नवी दिल्ली : (Iran on Trump Munir meet) इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असताना आता इराणने पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. "इराण-इस्त्रायल संघर्ष आहे. या संघर्षात तिसऱ्या पक्षाने येऊ नये. जर तिसरा देश सहभागी झाल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील", असे नवी दिल्लीतील इराणच्या उच्चायुक्त कार्यालयातील इराणी मिशनचे उपप्रमुख मोहम्मद जावेद हुसैनी यांनी म्हटले आहे.


पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. याबाबत प्रश्न विचारल्यावर जावेद हुसैनी म्हणाले, "इराण-इस्त्रायल संघर्ष आहे. त्यामध्ये तिसऱ्या पक्षाने येऊ नये. आमच्याकडे काही अघोषित शक्ती आहेत. त्या भविष्यासाठी आम्ही सुरक्षित ठेवल्या आहेत. या संघर्षात तिसरा देश आला तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. असीम मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यावर आम्ही लक्ष ठेवले आहे, असे जावेद हुसैनी यांनी म्हटले.

जावेद हुसैनी म्हणाले, "पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्याची आम्ही दखल घेतली आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची भेट घेतली होती आता ते डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले आहेत. सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, इराणचा शेजारी असलेला पाकिस्तान खऱ्या अर्थाने कोणत्या बाजूने आहे, तेहरान की वॉशिंग्टन?" भारतासंदर्भात आमची कोणतीही नाराजी नाही, असे हुसैनी यांनी स्पष्ट केले.






Powered By Sangraha 9.0