मविआ की, मनसे! उद्धव ठाकरे नेमके कुणासोबत? शरद पवारांच्या विधानानंतर संभ्रम

20 Jun 2025 18:19:33


मुंबई : शरद पवार म्हणाले की, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर आता निवडणूक लांबवता येणार नाही. त्यामुळे साधारण ३ महिन्याच्या आत निवडणूकीची प्रक्रिया सुरु होईल. त्यात आम्ही सर्वजण सहभागी होऊ."

ठाकरे बंधू एकत्र येण्यावर बाळा नांदगावकर यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, "राज ठाकरेंच्या मनात..."

मुंबईत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे शक्तीस्थान अधिक!

"आम्ही अजून चर्चा केलेली नाही. पण काँग्रेस पक्ष, आमचा राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आम्ही एकत्र बसून एकत्र निवडणूकीला सामोरे जाता येईल का याचा विचार करू. आमची एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा आहे. मुंबईत आमच्या सर्वांपेक्षा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे शक्तीस्थान अधिक आहे. त्यामुळे त्यांना विचारात घ्यावे लागेल," असेही ते म्हणाले.




Powered By Sangraha 9.0