उद्धव ठाकरेंची टीका! मुख्यमंत्री फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

20 Jun 2025 13:34:10


जळगाव : गुरुवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. शुक्रवार, २० जून रोजी जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेनेचा ब्रँड पुसाल तर तुमचे नामोनिशान मिटवून टाकेल, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही. हे बोलबच्चन आहेत आणि त्यांना मी उत्तर देत नाही," असे ते म्हणाले.

बिचाऱ्या उरलेल्या सैनिकांना किती दिवस खोटी आशा दाखवणार? केशव उपाध्येंचा उद्धव ठाकरेंना सवाल

"भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत आदिवासी समाजाचे खूप मोठे योगदान आहे. आपल्या अमृतकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा गौरव झाला पाहिजे यादृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले. खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा प्रचंड मोठा सहभाग होता. त्यामुळे मागच्या काळात मी या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आलो होतो. आता त्याचे उद्धाटन करण्याचीही संधी मिळाली याचा आनंद आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.




Powered By Sangraha 9.0