युक्रेनच्या 'ऑपरेशन स्पायडर वेब' मध्ये रशिया अडकला : रशियाला तब्बल ७ अब्ज डॉलर्सचे नुकसान
02 Jun 2025 19:30:54
मॉस्को : युक्रेनने रशियाच्या हवाई तळांवर केलेल्या ड्रोनने हल्ल्याने संपूर्ण जग हादरलेले आहे. सीमारेषेपासून सुमारे चार हजार कमी अंतरावर असलेल्या सायबेरियातील एक हवाईतळावर हा हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनने 'ऑपरेशन स्पायडर वेब' म्हणजेच ड्रोनचा एक थवा रशियाच्या पाच लष्करी हवाई तळांवर सोडला, ज्यामध्ये ४१ बॉम्बर विमाने आगीत जळून भस्मसात झाली. रशियाचे या हल्ल्यात ७ अब्ज डॉलर्सचे नुकसान सुद्धा झाले आहे.
या प्रसंगाची तुलना ट्रोजन हॉर्स या युद्धनितीशी केली जात आहे. कारण रशियाच्या अंतर्गत भागांत हे ड्रोन एका लाकडी छताखाली लपवून ठेवण्यात आले होते. या हल्ल्यासाठी एफपीव्ही (FPV) नावाचे विशेष ड्रोन रशियामध्ये तस्करी करून आणले गेले. युक्रेनने रविवारी १ जून रोजी रशियाच्या हवाई तळांवर ड्रोनने हल्ला केला. ’ऑपरेशन सायबर वेब’ म्हणजेच युक्रेनने ड्रोनचा एक थवा रशियाच्या पाच लष्करी हवाई तळांवर सोडला.
एकूण ४१ बॉम्बर विमाने यामुळे आगीत भस्मसात झाली. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्लयाचे वर्णन करत हा उत्तम प्रयत्न आहे, असा केला. हा हल्ला युक्रेनच्या इतिहासात महत्वाचे पान म्हणून कोरला जाईल, असेही म्हटले आहे. ऑपरेशन चे नियोजन १८ महिन्यांपूर्वी सुरू झाले होते.
एफपीव्ही (FPV) ड्रोन नावाचे विशेष ड्रोन रशियामध्ये तस्करी करून आणले गेले होते, त्यासोबतच फिरत्या लाकडी केबिन देखील आणल्या गेल्या होत्या. या केबिन ट्रकमधून वाहून नेल्या जात होत्या आणि ड्रोन आत लपवले जात होते. केबिनचे छत उघडले की नंतर या ड्रोनचे उड्डाण होते, अचूकपणे हल्ले करण्यासाठी हे ड्रोन जवळच्या तळांना नेमतात, मात्र युक्रेनने दावा केला आहे की या हल्ल्यात ७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे, या हल्ल्यात त्यांची अनेक लढाऊ विमाने सुद्धा नष्ट झाली आहेत.
युक्रेनने हल्ल्यामध्ये रशियाच्या मुर्मन्स्क, इर्कुत्स्क, इवानोवो, रियाझान आणि अमूर प्रदेशातील पाच हवाई तळांवर एफपीव्ही (FPV) ड्रोनने हल्ले केले आहेत. इवानोवो, रियाझान आणि अमूर हवाई क्षेत्रांवरील सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावण्यात आले आहेत, असे रशियन संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले.