१० जूनपर्यंत पावसाचा ब्रेक! कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

02 Jun 2025 13:18:25
 
Rain
 
मुंबई : राज्यात यंदा मे महिन्यातच दाखल झालेल्या पावसाने तुर्तास ब्रेक घेतला असून येत्या १० जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
 
 
 
बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली झाले. त्यामुळे मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज असून या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  भिवंडीत ATS ची मोठी कारवाई! साकिब नाचनच्या घरावर छापा
 
तसेच राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान अपेक्षित आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा व खानदेशात कमाल तापमान ३५ ते ४० अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
 
दुसरीकडे, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हांत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0