पॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा

02 Jun 2025 18:43:02
PM talks with President of Paraguay

नवी दिल्ली  : विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस यांची भेट घेतली.

राष्ट्राध्यक्ष पॅलासिओस त्यांच्या पहिल्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले आहेत. त्यांचे पालम हवाई दल स्टेशनवर त्यांचे औपचारिक स्वागत आणि गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी त्यांच्यासोबत द्विक्षीय चर्चा केली. यावेळी पंतप्रधान म्हणाले, डिजिटल तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे, ऊर्जा, शेती, आरोग्यसेवा, संरक्षण, रेल्वे, अंतराळ आणि एकूणच आर्थिक भागीदारी यासारख्या क्षेत्रात सहकार्याच्या नवीन संधी दोन्ही देशांसमोर आहेत. दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापार करारास विशेष प्राधान्य असून तो अधिक विस्तारण्यासाठी दोन्ही देश त्यासाठी एकत्र काम करण्यास सज्ज असल्याचे पंतप्रधांनांनी म्हटले आहे.

दहशतवादाविरुद्ध लढाईत भारत आणि पॅराग्वे एकमेकांसोबत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, सायबर गुन्हे, संघटित गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या सामायिक आव्हानांविरुद्ध लढण्यासाठी दोन्ही देशांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. भारत आणि पॅराग्वे हे ग्लोबल साऊथचे अविभाज्य भाग आहेत. दोन्ही देशांच्या आशा, आकांक्षा आणि आव्हाने समान असून त्यामुळेच परस्परांच्या अनुभवाचा लाभ करून विकासाचे ध्येय गाठण्यासाठी भारत सज्ज असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
Powered By Sangraha 9.0