रुग्णालय सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश सेवाभाव...'

02 Jun 2025 17:33:51
Devendra Fadnavis Inaugurated hospital at Nashik

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, जीवनपद्धती बदलल्यामुळे आजार वाढतात. मात्र गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्यामुळे जीवनमान उंचावले आहे. हे रुग्णालय सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश सेवा असल्यामुळे समाजातील गरिबातील गरीब माणसाची सेवा इथे होईल. या रुग्णालयातील आधुनिक उपचार पद्धती व अद्ययावत सोयी-सुविधांमुळे रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल.

रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचे प्रमुख डाॅ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डाॅ. पल्लवी धर्माधिकारी, व इतर मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0