भिवंडीत ATS ची मोठी कारवाई! साकिब नाचनच्या घरावर छापा

02 Jun 2025 12:46:04
 
Bhiwandi ATS
 
मुंबई : भिवंडी तालुक्यातील पडघा येथील बोरिवली गावात महाराट्र एटीएसने छापेमारी केली असून अनेक घरांची तपासणी करण्यात येत आहे. दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरून अनेक घरांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
सोमवार, २ जून रोजी सकाळपासूनच एटीएसचे पथक भिवंडीत दाखल झाले आहे. या कारवाईदरम्यान, काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. बोरिवली गावात कुख्यात दहशतवादी साकिब नाचन याच्या घरावरही एटीएसने छापा टाकला असून घराची चौकशी सुरु आहे.
 
यापूर्वी दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात साकिब नाचन हा दोषी आढळला होता. साकिब नाचन बंदी घातलेल्या स्टूडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या संघटनेचा दहशतवादी असल्याची माहिती आहे. दरम्यान, या छापेमारीमध्ये काही संवेदनशील माहिती मिळण्यासाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0