WhatsApp Update: आता व्हाट्सअॅपलासुद्धा दिसणार अधिकृत जाहिराती

    19-Jun-2025
Total Views |

कॅलिफोर्निया : जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडीया प्लटफॉम पैकी व्हाट्सअॅप हे आता आपल्या वापरकर्त्यांसाठी जाहिराती पर्याय सुरू करत आहे. व्हाट्सअॅपची मूळ कंपनी असणारी 'मेटा'ने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. यादरम्यान व्हाटअॅपचे सह- संस्थापक जॅन कौम यांनी दिलेलं वचन हे खोटं ठरलं आहे.

कुठे दिसणार जाहिराती?

व्हाट्सअॅपच्या नवीन अपडेटप्रमाणे चॅट इंटरफेसमध्ये जाहिराती दाखवल्या जाणार नाहीत. परंतु, अपडेट्स टॅबमध्ये, ज्या ठिकाणी वापरकर्ते त्यांचे स्टेटस अपलोड करतात आणि विविध चॅनेलचे अपडेट पाहतात, ज्याप्रकारे इंस्टाग्रामवर काही स्टोरीज पाहील्यानंतर जाहिराती दिसतात तसेच व्हाट्सअॅपलाही अशाच प्रकारे जाहिराती दिसणार आहेत.

मेटाने प्रसिध्द केलेल्या निवेदनानुसार, व्हाट्सअॅपचा अपडेट्स टॅब दररोज जगभरातील दीडशे कोटी लोक वापरतात, ज्यामुळे कंपनीसाठी मोठ्या कमाईची महत्त्वपूर्ण क्षमता यात दिसून येते. "आम्ही असा व्यवसाय तयार करत आहोत जो वापरर्कत्यांच्या वैयक्तिक चॅटमध्ये व्यत्यय आणणार नाही. आणि आम्हाला विश्वास आहे की अपडेट्स टॅब हे जाहिरातींच्या योजनांसाठी योग्य ठिकाण आहे, जर तुम्ही फक्त मित्रांसोबत आणि अन्य चॅट करण्यासाठी व्हाट्सअॅप वापरत असाल तर तुमच्या अनुभवात कोणताही बदल होणार नाही," असे मेटाने म्हटले आहे.

दिलेल वचनच ठरल खोटं ?

व्हाट्सअॅपने अधिकृत जाहिराती सादर केल्याच्या पार्श्वभूमीवर, व्हॉट्सअॅपचे सह-संस्थापक जॅन कौम यांचा २०१२ मधील एक ब्लॉग समोर आला आहे, ज्यात कौम यांनी अस वचन दिल होत की, व्हाट्सअॅप हे तुम्हाला अपडेट ठेवेल, कोणालाही झोपेतून उठून जाहिराती दाखवण्याचे काम व्हाट्सअॅप करणार नाही. परंतू कौम यांच दिलेल वचनच ठरल खोटं ठरल आहे.