रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी मुश्ताक बाबा यांची नियुक्ती - गौतम सोनवणे

19 Jun 2025 20:28:32

मुंबई, पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते मुश्ताक बाबा यांची अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केली.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुश्ताक बाबा यांची रिपाइं च्या अल्पसंख्यांक आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.यावेळी रिपाइं अल्पसंख्यांक आघाडीचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुश्ताक बाबा, रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, उपाध्यक्ष सोहेल शेख आदी मान्यवर उपस्थित होते. खुद्रुसभाई फारुकी,रफीक दफेदार,खाजाभाई शेख,हसन शेख,अझिदन शेख,सय्यद हबीब,हसिम शेख, दयाळ बहादुर प्रकाश जाधव संजय पवार सुनील पवार अफझल चौधरी हे ही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते मुश्ताक बाबा हे भारतीय दलित पँथर पासून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी एकनिष्ठ समर्थक राहून रिपब्लिकन पक्षात भरीव योगदान दिले आहे.निष्ठेने रिपब्लिकन पक्षाचे काम केल्याने मुश्ताक बाबा यांची केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड केली असल्याची माहिती रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केली.

दलित बहुजन समाजासोबत अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीशी उभे राहणारे संघर्षनायक नेते एकमेव रामदास आठवले आहेत.त्यामुळे आपण लोकनेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षात 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून काम करीत आहोत.आज रिपब्लिकन पक्षाने नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून मला अल्पसंख्यांक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन मला न्याय दिला आहे.तो विश्वास मी सार्थ करून दाखविणार आहे. सर्वांना सोबत घेऊन अल्पसंख्यांक आघाडी चे काम करीत राहणार आहे असे मनोगत मुश्ताक बाबा यांनी व्यक्त केले.



Powered By Sangraha 9.0