
मुंबई : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून सांगलीतील काँग्रेसच्या गडाला सुरुंग लागला आहे. बुधवार, १८ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार संजय केनेकर, भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील नेत्या जयश्री पाटील यांच्या नेतृत्वात सांगली महानगरपालिकेतील माजी महापौर, माजी नगरसेवक, सांगली जिल्ह्यातील आजी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य व त्यांच्या असंख्य समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
कुणाकुणाचा प्रवेश?
माजी महापौर किशोर शहा, कांचन कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजळेकर, विरोधी पक्षनेता उत्तम साखळकर, माजी स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, माजी सभापती शेवंताताई वाघमारे, माजी नगरसेवक अजित सूर्यवंशी, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, करण जामदार, प्रकाश मुळके, अजित दोरकर, तानाजी पाटील, सुभाष यादव, संग्राम पाटील, आनंदराव पाटील, सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील जाधव पाटील यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.