AI UPDATE: AI मुळे बेरोजगारी?...आणि 'सुरक्षित' नोकऱ्या संपुष्टात!

19 Jun 2025 16:30:31

मुंबई: AI चे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनी संपूर्ण जगाला इशारा दिला की एआयमुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होऊ शकते. 'सुरक्षित' असणाऱ्या नोकऱ्या या एआय मुळे संपुष्टात येऊ शकतात. असे विधान जेफ्री हिंटन यांनी केले आहे.

सोमवार दि. १६ जून रोजी प्रसारित झालेल्या 'डायरी ऑफ अ सीईओ' या पॉडकास्टमध्ये बोलताना हिंटन म्हणाले की, "एआय प्रणालीत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण करण्याची क्षमता आहे. एआय सर्व नोकऱ्यांची जागा घेऊ शकते." यावरून एआय हे कीती जबरदस्त आहे हे हिंटन यांनी पुन्हा अधोरेखित केल आहे. हिंटन म्हणाले, "मला वाटते की मानवी बुद्धीच्या प्रत्येक कामाकरता एआय जागा घेऊ शकते."

एआय नवीन नोकऱ्या निर्माण करेल का? या प्रश्नाला हिंटन यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, "जर एआयने मानवी बुद्धीची कामे ही स्वयंचलित केली तर काही वर्गातील लोकांसाठी नोकऱ्या या थोड्या प्रमाणात शिल्लक राहतील." "एआयला येत नसलेले काम करण्यासाठी त्या विशीष्ट व्यक्तीला खूप कुशल असणे आवश्यक आहे," असे हिंटन म्हणाले. ओपनएआय कंपनीच्या गुंतवणूकदारांना खूश करणे आणि कंपनीसाठी अधिकचा नफा मिळवणे या हेतूने ही पॉडकास्ट मुलाखत घेण्यात आली होती.

कोण आहेत जेफ्री हिंटन?

१९७० पासून न्यूरल नेटवर्क्सच्या सुरू केलेल्या कामामुळे जेफ्री हिंटन यांना "एआयचा गॉडफादर" ही पदवी दिली गेली आहे. मशीन लर्निंग वरील कामासाठी हिंटन यांना २०२४ सालामधील भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते . सध्या हिंटन टोरंटो विद्यापीठात संगणक विज्ञान शिकवण्यासाठी कार्यरत आहेत.




Powered By Sangraha 9.0