एक निरागस प्रेमकथा जी एका क्षणात विश्वासघाताच्या ठिणगीने सुडाच्या आगीत भडकते,"सजना" सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित!

18 Jun 2025 13:16:59
 
trailer of the movie sajna released!
मुंबई : प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सुड! मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे "सजना" चित्रपटाचा हा ट्रेलर. जो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे. या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील विविध मनोरंजनशी संबंधित चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आला. म्हणजेच सजना चित्रपटाचा ट्रेलर मराठी एंटरटेनमेंट डिजिटल मीडिया नेटवर्कवर एकत्रितपणे थेट प्रक्षेपित करण्यात आला.

ह्या ट्रेलर मध्ये सुंदर प्रेमाची सुरुवात, विचारसरणीतील अंतर, भावनिक संघर्ष, सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट आपण पाहू शकतो.

शशिकांत धोत्रे आर्ट निर्मित आणि प्रस्तुत "सजना' सिनेमातील ह्या ट्रेलर मध्ये नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येतात अनेक संघर्ष. मैत्रीचं प्रेमात रूपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सुड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. प्रत्येक वळणावर गोष्ट बदलते, पात्रांचे रंग बदलतात आणि कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते. शेवट अकल्पनीय आहे. जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सर्व काही संपलं, तेव्हाच ही कथा घेते एक अनपेक्षित वळण, जे तुमचं मन सुन्न करतं. त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.

'सजना' या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. छायाचित्रण रणजित माने ह्यांनी केलं आहे. संगीत ओंकारस्वरूप ह्यांचं असून सिनेमातील रोमान्टिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनले आहेत. "सजना" हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात २७ जून २०२५ पासून प्रदर्शित होणार आहे!


Powered By Sangraha 9.0