मेट्रो३चे वन डिजिटल प्लॅटफॉर्मवर आगमन

18 Jun 2025 19:50:11


मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ३ अ‍ॅक्वा लाईन आता ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) या डिजिटल नेटवर्कशी जोडली गेली आहे. यामुळे प्रवाशांना इझी माय ट्रिप, रेड बस, यात्री आणि वन तिकीट यांसारख्या ओळखीच्या अ‍ॅप्सवरून क्यूआर कोड तिकीट अगदी सहज खरेदी करता येणार आहे. एक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे वेगवेगळ्या अ‍ॅप्सना जोडले जाते. त्यामुळे वेगळं अ‍ॅप डाऊनलोड करणे किंवा तिकिट खिडकीवर न जाता मेट्रो ३ च्या तिकीट विकत घेता येऊ शकते.


इझी माय ट्रिप, रेड बस, यात्री,माईल्स अँड किलोमीटर्स, टु, वन तिकीट, हायवे डिलाईट अशा अ‍ॅप्सवरून आता क्यूआर कोड तिकीट खरेदी करता येईल. यामध्ये वन तिकीट अ‍ॅपवरून तर तुम्ही मुंबई मेट्रो मार्ग ३, १, २A आणि ७ च्या तिकिटांसह सहज प्रवास करता येईल. मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, “ही नवी सेवा सुरू करून आम्ही मेट्रो प्रवास अधिक सोपा, जलद आणि डिजिटल करत आहोत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि भारत डिजिटल बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जाईल.”
Powered By Sangraha 9.0