"आता कोणतीही दया दाखवणार नाही"; इराणकडून इस्त्रायलविरुद्ध युद्धाची अधिकृत घोषणा, खामेनी यांची पोस्ट

18 Jun 2025 16:55:12

Israel-Iran War Iran

तेहरान : (Israel-Iran War) गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेला इस्रायल-इराण संघर्ष आता विकोपाला गेला आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला जाहीर पाठिंबा देत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली हुसेनी खामेनी यांना ठार करण्यासंदर्भात विधान केले होते. यानंतर खोमेनी यांनी बुधवारी एक्सवर पोस्ट करत युद्धाची अधिकृत घोषणा केली आहे. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेली लढाई थांबावी, अशी आशा जगभरातून व्यक्त करण्यात येत होती. पण आता लढाई सुरू होत आहे, असे म्हणत इराणकडून इस्त्रायलविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे.

"Help from Allah and an imminent conquest" (Holy Quran: 61:13).

The Islamic Republic will triumph over the Zionist regime by the will of God. pic.twitter.com/sUZvapaV4G
— Khamenei.ir (@khamenei_ir) June 16, 2025

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेली लढाई थांबावी, अशी आशा जगभरातून व्यक्त करण्यात येत होती. पण आता लढाई सुरू होत आहे, असे म्हणत इराणकडून इस्त्रायलविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. इराणचे प्रमुख राजकारणी अयातुल्ला खामेनी यांनी सुरुवातीला “ईश्वराच्या परवानगीने इस्लामिक रिपब्लिक झिओनिस्ट राजवटीचा पराभव करेल” असे सोशल मीडियावर लिहिले होते. १७ जूनला मध्यरात्री खामेनी यांनी ही पोस्ट केली होती. त्यानंतर बुधवारी १८ जूनला खामेनी यांनी थेटपणे युद्धाचीच घोषणा केली आहे.

We must give a strong response to the terrorist Zionist regime.
We will show the Zionists no mercy.
— Khamenei.ir (@khamenei_ir) June 17, 2025

खामेनी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करत लिहिले आहे की, “महान हैदरच्या नावाने, युद्ध सुरू झाले आहे.” तसेच, “आता दहशतवादी झिओनिस्ट राजवटीला कडक प्रत्युत्तर दिले पाहिजे. आम्ही त्यांच्याबाबतीत आता कोणतीही दया दाखवणार नाही,” असेही म्हटले आहे. या घोषणेनंतर इराणकडून इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.
Powered By Sangraha 9.0