'महाराष्ट्र पक्षिमित्र' संघटनेकडून अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

18 Jun 2025 22:22:06
maruti chitampalli


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
ज्येष्ठ निसर्ग लेखक, अभ्यासक आणि अरण्यऋषी अशी बिरुदावली मिळालेले मारुती चितमपल्ली यांचे बुधवार दि. १८ जून रोजी सोलापूर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले (maruti chitampalli). मारुती चित्तमपल्ली यांच्या जन्मादिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात ५ ते १२ नोव्हेंबर या काळात दरवर्षी पक्षी सप्ताह साजरा करण्यासाठी 'महाराष्ट्र पक्षीमित्र' संघटनेकडून सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता (maruti chitampalli). त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो (maruti chitampalli). चितमपल्ली यांच्या निधनानंतर 'महाराष्ट्र पक्षीमित्र' संघटनेकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. (maruti chitampalli)
 
 
'महाराष्ट्र पक्षीमित्र' संघटनेचे अध्यक्ष डाॅ. जयंत वडतकर यांनी सांगितले की, "अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने भारतातील जंगलांशी नाळ जुळलेले एक निसर्गप्रेमी अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. तब्बल चार दशकांहून अधिक काळ त्यांनी निसर्ग संशोधन लेखन आणि संवर्धनासाठी समर्पित केला.महाराष्ट्र पक्षिमित्र संघटने सोबत मारुती चितमपल्ली यांचे अगदी चळवळीच्या सुरवातीपासून म्हणजे १९८१ पासुन ऋणानुबंध होते. ते लोणावळा येथे पार पडलेल्या पहील्या संमेलनास उपस्थित होते. त्यानंतर ते १९९३ सालच्या पहील्या विदर्भ पक्षिमित्र संमेलनास उद्घाटक म्हणून लाभले होते. नाशिकच्या १९८५ ला पार पडलेल्या सहाव्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. विशेष म्हणजे या संमेलनाचे उद्घाटक प्रसिद्ध साहित्यिक वि वा शिरवाडकर हे होते. अमरावती येथे पार पडलेल्या २६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनास ते उद्घाटक म्हणून लाभले आणि संपूर्ण दोन दिवस थांबून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक पक्षिमित्रांशी त्यावेळी संवाद साधला होता. २०२० साली त्यांना महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस ५ नोव्हेंबर हा असुन जगप्रसिद्ध पक्षी अभ्यासक डॉ सालिम अली यांचा जन्मदिवस १२ नोव्हेंबर हा आहे. हा योगायोग साधून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे नोव्हेंबर मधे ५ ते १२ नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह साजरा करण्याची २०१७ पासून सुरुवात केली होती, पुढे महाराष्ट्र शासनाने हा पक्षी सप्ताह शासन स्तरावर साजरा करावा यासाठी म.प. तर्फे पाठपुरावा करण्यात आला. २०२० ला हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला. महाराष्ट्र पक्षिमित्रची ही एक मोठी उपलब्धी होती. सरकारने नुकताच त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला तो दिवस महाराष्ट्र पक्षिमित्रसाठी अभिमानाचा दिवस होता. मारुती चितमपल्ली यांची पुस्तके वाचून आमच्या पिढीतील अनेक जन जंगल आणि पक्षी अभ्यास व संवर्धनाकडे वळलेत. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे आम्हाला मार्गदर्शन मिळाले. महाराष्ट्र पक्षिमित्र त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांचे जाण्यामुळे महाराष्ट्र पक्षिमित्रची अपरिमित हाणी झाली आहे."
Powered By Sangraha 9.0