एक असा ज्योतिषी ज्याच्याकडे आहे ८० हजार गुन्हेगारांची कुंडली!

17 Jun 2025 19:17:06
 
up IPS Shravan Kumar Singh
 
लखनऊ : सर्वांनी ज्योतिषीजवळ आपली कुंडली केव्हा ना केव्हा तरी पाहिली असेलच. पण उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एक आयपीएस अधिकारी असा आहे ज्याने गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. हे अधिकारी म्हणजे आयपीएस श्रवण कुमार सिंह. ज्यांच्याजवळ पश्चिम उत्तर प्रदेशापासून कानपूरपर्यंतच्या ८० हजार गुन्हेगारांची संपूर्ण कुंडलीच आहे. या ज्योतिषी आयपीएस अधिकाऱ्याला चांगलेच माहिती आहे की, उत्तर प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्याच्या कोणत्या कोणत्या गावात कोण व कीती गुन्हेगार आहेत.
 
शंभर दोनशे नव्हे तर तब्बल ८०,००० गुन्हेगारांची कुंडली!
 
आयपीएस सिंह यांनी हायस्कूलनंतर आपले शिक्षण सोडले. या दरम्यान, ते एका अधिकाऱ्याला भेटले ही भेटच सिंह यांच्या आयुष्याचा उद्देश बदली. ते अभ्यास करू लागले आणि पीपीएस अधिकारी बनले, आणि गुन्हेगारीला मुळापासून नष्ट करण्याचे त्यांनी सुरू केले. आतापर्यंत ३२ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत आयपीएस सिंह यांनी २० गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यात सिंग हे तज्ज्ञ आहेत. गुन्हेगारांचा डेटा ते नेहमीच आपल्यासोबत ठेवतात. त्यांच्याकडे ८० हजार गुन्हेगारांच्या कुंडल्या आहेत.
 
युपीतील गुन्हेगारांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात त्यांना दोनदा पोस्टिंग मिळाली आहे. सिंग यांची बदली जिथे होते तिथे ते नेहमीच गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जातात. १९९२ च्या बॅचचे पीपीएस अधिकारी श्रवण सिंग यांना २०१४ मध्ये आयपीएस पदावर बढती मिळाली. सिंग हे सध्या कानपूरमध्ये डीसीपी सेंट्रल म्हणून सेवा बजावत आहेत.
 
अश्या बनवल्या कुंडल्या
 
आयपीएस सिंग सांगतात की, "मी सेवेत रुजू झाल्यानंतर गुन्हेगारांची मानसिकता वाचायला लागलो, गुन्ह्याच्या ठिकाणी मी जाऊन पुरावे गोळा करायचो. यामध्ये, मी घटनास्थळी सहकाऱ्यांसोबत बैठका घ्यायचो. चौकशी आणि जबाब नोंदवल्यानंतर जे सत्य समोर यायचे त्याने प्रकरणे लवकरात लवकर सोडवण्यास मदत व्हायची."
 
या दरम्यान, "मी स्वतःची गुन्हेगारी डायरी लिहायचो आणि तीच माझी सवय झाली. १९९९ मध्ये, मी गाजीपूरमधील मोठ्या ड्रग्ज व्यवसायाचा अंत केला. याशिवाय, मी मेरठ, आग्रा, बनारस, मथुरा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील अन्य भागातील ८० हजारहून अधिक गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार केल्या आणि त्यांना मुळापासून नष्ट करण्याचे काम केले."
 
 
Powered By Sangraha 9.0