राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे किती बरसणार? जाणून घ्या...

17 Jun 2025 09:57:49


मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसानंतर आजही (१७ जून) राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत अलर्ट जारी करण्यात आला असून विविध ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत ऑरेंज अलर्ट!

भारतीय हवामान खात्याकडून, दिनांक १७ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईत पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या १९१६ किंवा ०२२- २२६९४७२५ / २७ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

कोकणातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




Powered By Sangraha 9.0