इराण-इस्त्रायल युद्ध : जाणून घ्या आतापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम...

17 Jun 2025 14:32:33

नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत अशांतता वाढत आहे. इस्रायल आणि इराणमधील या सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत मोठे नुकसान झाले असून या युद्धात अनेक लोक मारले गेले आहेत तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यामुळे जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. १२ जून २०२५ च्या रात्री इस्रायलने इराणवर हल्ला केला असून आज या युद्धाचा पाचवा दिवस आहे. या दरम्यान, आतापर्यंत २२४ इराणी नागरिक ठार झाले आहेत तर १ हजार ४८१ जण जखमी झाले आहेत. तसेच इस्रायलमधील २४ जण मृत्युमुखी पडले असून ६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्रायलने तेहरानवर अनेक वेळा हवाई हल्ले केले आहेत.

अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान रद्द! दुर्घटनेनंतर पहिल्यांदाच जाणार होतं लंडनला; काय घडलं?

इस्रायलने तेहरानवर अनेक वेळा हवाई हल्ले केले आहेत. तर इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि हैफा येथे इराणने बॉम्बहल्ला केला आहे,. या युद्धामुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये जारो लोक अडकले असून ते पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने आपल्या नागरिकांना जॉर्डन आणि इजिप्त मार्गे देश सोडण्यास सांगितले आहे. चिनी दूतावासानेही इस्रायलमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे आवाहन केले आहे.

या संघर्षादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची राजधानी तेहरान तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलकडून इराणवर सतत क्षेपणास्त्रे डागण्यात येत आहेत. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या भयंकर युद्धादरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधून सुरक्षित ठिकाणी पाठवले जात आहे.






Powered By Sangraha 9.0