डोंबिवली : शहराच्या पूव्रेतील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन सोहळा भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या नवीन इमारतीमुळे शाळेला नवा लूक मिळणार आहे.
डोंबिवलीतील ब्राह्मण सभा हॉलच्या पाठीमागे कल्याण डोंबिवली महापालिकेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,शाळा क्रमांक 82 आहे. या नवीन शाळा इमारतीमुळे परिसरातील विद्याथ्र्याना उत्तम शिक्षण, दज्रेदार पायाभूत सुविधा आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने विद्याथ्र्याच्या शैक्षणिक विकासासाठी भौतिक सोयी-सुविधा वाढवण्याचे हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. पालक, नागरिक आणि समाजातील सर्व स्तरातून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
अशी असणार शाळेची इमारत
शाळेची नवीन इमारत तळ अधिक तीन मजली असणार असून यामध्ये 13 वर्ग खोल्या, 1 सभागृह, 1 मुख्याध्यपक खोली, 1 अॅडमिन खोली अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. यासाठी शासनाकडून 116 कोटी 70 लाख रु. निधी तर महापालिकेकडून 378 कोटी 24 लाख निधी असे एकूण 494 कोटी 94 लाख रु. ची तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. साधारणपणो 1 वर्षाच्या कालवधीत सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यावेळी महापालिकेचे माजी पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त प्रसाद बोरकर, शिक्षण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच मान्यवर उपस्थित होते.