ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचे निधन

16 Jun 2025 11:11:51

प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचे निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांनी पत्रकारितेला मराठा दैनिकातून सुरुवात केली. नंतर 'मिड डे'मध्ये राजकीय संपादक म्हणून राजकारणाची तत्त्वाधिष्ठित मांडणी केली. ‘विवेक’, ‘धर्मभास्कर’, ‘हिंदुस्थान समाचार’सारख्या संस्थांमधून आणि अलीकडे 'अधोरेखित' या युट्युब वाहिनीच्या माध्यमातून ते राष्ट्रीय विचारांचा प्रसार सातत्याने करत राहिले.


त्यांच्या जाण्याने एक सजग, निर्भीड आणि मूल्यनिष्ठ पत्रकार हरपला आहे. हिंदुत्वला नवा मार्ग दाखवणारा एक विचारवंत स्तंभ कालबाह्य झाला.

त्यांची अंत्ययात्रा उद्या दुपारी २ वाजता मुंबई आयआयटी येथून निघणार आहे.


Powered By Sangraha 9.0