अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रांसह भारताचा पाकवर वरचष्मा कायम ; एसआयपीआरआयचा निष्कर्ष

16 Jun 2025 14:58:58


नवी दिल्ली
: भारताने आपल्या अण्वस्त्रांमध्ये २०२४ सालच्या १७२ वरून २०२५ साली १८० एवढी वाढ केली आहे. त्याचप्रमाणे भारताने प्रगत अणुवितरण प्रणालीदेखील विकसित करून पाकिस्तानवर वरचष्मा कायम ठेवला आहे, असा निष्कर्ष स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (एसआयपीआरआय) च्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आला आहे.

भारताने नवीन प्रकारची क्षेपणास्त्रे तयार केली आहेत, जी 'कॅनिस्टेराइज्ड' म्हणजेच बंद कंटेनरमध्ये ठेवलेली असतात. या क्षेपणास्त्रांमध्ये अण्वस्त्र आधीच लावून ठेवता येतात, त्यामुळे त्या जास्त सुरक्षितपणे आणि सहजपणे नेता येतात. या नव्या प्रणालीमुळे, शांततेच्या काळातही भारत अण्वस्त्र नेऊ शकतो. भविष्यात या क्षेपणास्त्रांमधून एकावेळी अनेक अण्वस्त्रे सोडता येतील, अशी क्षमता या प्रणालींमध्ये असेल; असे एसआयपीआरआय अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

भारतातील नवीनतम पुढील पिढीतील डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममध्ये अग्नि प्राइम (अग्नि-पी) क्षेपणास्त्र आणि मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) सक्षम अग्नि-५ प्रणाली यांचा समावेश आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या मते, अग्नि-पी ही अग्नि मालिकेतील क्षेपणास्त्रांची एक नवीन पिढीची, प्रगत आवृत्ती आहे. हे एक कॅनिस्टराइज्ड क्षेपणास्त्र आहे ज्याचा पल्ला १००० ते २००० किलोमीटर आहे. अग्नि-पीची नवीनतम चाचणी गेल्या वर्षी घेण्यात आली होती. भारताने गेल्या वर्षी एमआयआरव्ही -सक्षम अग्नि-५ ची यशस्वी चाचणी देखील केली. हे क्षेपणास्त्र ५,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे.

दरम्यान, पाकिस्तानने नवीन अणु वितरण प्रणालीचा विकास सुरू ठेवला असून आणि २०२४ मध्ये अधिक विखंडन सामग्री जमा केली आहे. याद्वारे येत्या दशकात आपले अणु शस्त्रागार आणखी वाढवण्याचा पाकचा हेतू सूचित होतो.
Powered By Sangraha 9.0