धर्मांधांनी मंदिराबाहेर फेकले गोमांसाचे तुकडे; मुख्यमंत्र्यांनी दिले 'Shoot at Sight'चे आदेश

16 Jun 2025 13:20:20

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
आसाममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून इस्लामिक कट्टरपंथी हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिर परिसरात वारंवार गोमांस फेकून हिंदूंच्या श्रद्धेची खेळण्याचा प्रयत्न होतो आहे. आसामच्या लखीपूर येथील काली मंदिराजवळ गोमांस फेकण्याची घटना घडल्याने परिसरात जातीय तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी आसाममधील धुबरीमध्येही असाच काहीसा प्रकार घडला होता. त्यामुळे स्थानिक हिंदूंमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी सुद्धा आरोपींना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिलेत.

लखीपूर येथील घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून गोमांस (गायीचे कापलेले शीर) ताब्यात घेतले. त्याचबरोबर तणाव आणखी वाढू नये म्हणून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी ५ इस्लामिक कट्टरपंथीयांनाही अटक केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबतचे आश्वासन दिले आहे. तसेच त्यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेशही दिले. धुबरी प्रकरणातील एकूण ३८ जणांना अटक करण्यात आली आहे.


Powered By Sangraha 9.0