कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत! जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकारतर्फे

16 Jun 2025 14:05:53


मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर या घटनेतील जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चदेखील राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे.

रविवार, १५ जून रोजी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक त्यात वाहून गेले. या घटनेची माहिती कळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा मृत्यू झाला असून ५१ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तर अनेकजण या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

...तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा सवाल

दरम्यान, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चसुद्धा राज्य सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.



Powered By Sangraha 9.0