कणकवलीत १७ जूनला आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा

15 Jun 2025 17:22:20


सिंधुदुर्ग : वैदिक परंपरेचे जतन आणि अध्यात्मिक उन्नतीचा संकल्प घेऊन वैदिक धर्म संस्थान व ‘दि आर्ट ऑफ लिव्हिंग – सिंधुदुर्ग’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १७ जून रोजी एक विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रशिक्षक दर्शक हाथी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात १ सहस्र वर्षे पुरातन असलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि रुद्रपूजा होणार आहे.

हा कार्यक्रम दोन सत्रांत आयोजित करण्यात आला आहे.


पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत शहरातील बसस्थानकासमोरील उत्कर्षा हॉटेल येथे पार पडणार आहे. या सत्रात रुद्रपूजा व सोमनाथ दर्शन सोहळा संपन्न होईल.
यानंतरचे दुसरे सत्र दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत प.पू. भालचंद्र महाराज मठ, सिंधुदुर्ग येथे पार पडणार आहे.


हा संपूर्ण सोहळा विनामूल्य असून, केवळ पूर्वनोंदणी आवश्यक आहे.


अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी ९६५७४७९८६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी केले आहे.

शुद्ध वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक रीतिरिवाज, आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवण्यासाठी हा सोहळा धर्मप्रेमी आणि साधकांसाठी एक दुर्मिळ संधी ठरणार आहे.
स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0