प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

15 Jun 2025 18:59:46


पालघर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ 16 जून रोजी पालघर जिल्हयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्ह्यातील आमदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ करण्यात येत आहे.

दुर्वेश, ता. पालघर, येथील जिल्हा परिषद शाळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट देणार असून पालक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मनोर येथील मैदानावर आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागा अंतर्गत मोखाडा येथील शासकीय माध्यमिक शाळा, गुहिर ता. वाडा येथील शासकीय माध्यमिक शाळा या नूतन इमारतीचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात येणार आहे. रायतळे व आपटाळे ता. जव्हार येथील प्रधानमंत्री जनमन अंतर्गत बहुउद्देशीय केंद्राचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात येणार आहे.

महत्त्वकांक्षी वाढवण बंदर प्रकल्प वाढवण पोर्ट यांच्या माध्यमातून पालघर जिल्हा जेएनपीटी

अंतर्गत कौशल्य विकास विभाग व रोजगार संबंधी उपक्रम राबविण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि वाढवण पोर्ट प्रा. लि. यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात येणार आहे. सवलतीच्या व्याजदरात डायमेकर क्लस्टर साठी जे. एन. पी. ए. (JNPA) आणि युनियन बैंक ऑफ इंडिया यांच्या सहकायनि राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेअंतर्गत सवलतीच्या व्याजदरात निधी उपलब्ध करून देणारे निधीपत्र वितरण, वाढवण पोर्ट कौशल्य विकास उपक्रमांतर्गत कस्टम डॉक्युमेंटेशन अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मधील प्रशिक्षणार्थीना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संबंधित प्रशिक्षण देण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि कॉनफेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीज (CII), यांच्या दरम्यान सामंजस्य करार, पालघर जिल्हा अंतर्गत शासकीय आयटीआय मधील प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व ब्लू स्टार प्रा. लि. औद्योगिक आस्थापने दरम्यान सामंजस्य करार करण्यात येणार आहे तसेच वसई विरार शहर महापालिका अंतर्गत सर डी एम पेटिट रुग्णालय येथील विस्तारित इमारतीचा आभासी पद्धतीने उ‌द्घाटन, मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस आयुक्त परिमंडळ 3, विरार कार्यालय, सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग कार्यालय, वाहतूक शाखा विरार विभाग कार्यालय, भरोसा सेल

वसई विरार कार्यालय, विशेष शाखा वसई विरार कार्यालय, दळणवळण व तंत्रज्ञान विभाग, वसई विरार कार्यालय यांचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येत आहे.

16 जुन 2025 रोजी मनोर, ता. पालघर या ठिकाणी होणाऱ्या या महत्वाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी विविध शासकीय अधिकारी यांच्या समवेत कार्यक्रम स्थळी भेट देवून तसेच बैठक घेऊन आढावा घेतला. या आढावा बैठकीस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार, पोलीस अधिक्षक यतीश देशमुख अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्रीम. अपूर्वा बसूर, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी महेश सागर उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, सर्व उपविभागीय अधिकारी तहसिलदार बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, एनएचआयचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांसाठी सर्व सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या असून नागरिकांनी कार्यक्रम स्थळी येताना बॅग पिशवी तसेच पाण्याची बॉटल आणि खाद्य पदार्थ घेऊन येऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्याकडून सर्व तयारीचा आढावा घेतला व जिल्हा स्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्याकडून करण्यात आलेल्या तयारी विषयी समाधान व्यक्त केले.


Powered By Sangraha 9.0