सोलापूर, दिल्लीतील इंस्टाग्रामवर सक्रिय असलेला ‘रील स्टार’ अजनान उर्फ समीर मोहम्मद नसिम (वय १९) याने सोलापूरच्या १७ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीशी इंस्टाग्रामवरून संपर्क साधून, लग्नाचे आमिष दाखवत तिची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अजनान याला अटक केली असून, त्याच्यावर विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आरोपीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. या संवादातून आरोपीने प्रेमाचे नाटक करत तिच्यावर विश्वास संपादन केला. काही महिन्यांनी सोलापूर येथे प्रत्यक्ष भेट घेत असताना आरोपीने तिला लग्नासाठी तयार होण्यास सांगितले. आरोपीने "मी हिंदू धर्म स्वीकारतो" असे सांगून तिला लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.
९ जून रोजी आरोपी सोलापूरमध्ये आला असताना त्याची व पीडितेची एका लॉजमध्ये भेट झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉस्को कायदा, फसवणूक, अल्पवयीन मुलीला बहला-फुसलवून पळवणे आणि लग्नाच्या बहाण्याने धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करण्याचे संबंधित गुन्हे या प्रकरणात ११ जून रोजी दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेला ‘सोशल मीडिया लव्ह जिहाद’ असा संदर्भ दिला जात असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटनांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वापर करताना अल्पवयीन मुलींनी व त्यांच्या पालकांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सोशल मीडियाच्या वापरांवर जागरूक राहावे
एक अधिवक्ता आणि हिंदू समाजातील जबाबदार नागरिक म्हणून सांगावेसे वाटते की, ‘सोशल मीडिया लव्ह जिहाद’ हे फक्त वैयक्तिक फसवणूक नाही, तर सामाजिक आणि धार्मिक विषमता निर्माण करणारे कट आहेत. अल्पवयीन मुलींच्या भावना, श्रद्धा आणि भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मुलींनी आणि विशेषतः पालकांनी सोशल मीडियावर अधिक सावध आणि जागरूक राहणे अत्यावश्यक आहे.
एड. प्रणील गाढवे- अधिवक्ता उच्च न्यायालय