नवी दिल्ली : (NEET (UG) 2025 Results Out) राष्ट्रीय चाचणी संस्थे (NTA) ने NEET UG 2025 चा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. ४ मे ला झालेल्या नीटच्या परीक्षेला जवळपास देशभरातून २१ लाख विद्यार्थी बसले होते. त्या सगळ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आता या निकालानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशन फेरी पार पडेल, त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा NEET UG 2025 चा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) वेबसाईटवर पाहता येणार आहे. निकालाची लिंक अधिकृत वेबसाइट
https://neet.nta.nic.in वर सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवार स्कोअरकार्ड आणि रँक तेथे तपासू शकतात.
तुमचा NEET UG 2025 निकाल कसा तपासायचा?
होमपेजवरील 'NEET UG 2025 निकाल' किंवा 'निकाल पहा' लिंकवर क्लिक करा.
अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन अशी विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा.
सबमिट बटणावर क्लिक केल्यावर, तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
तुम्हाला तो निकाल पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येईल.