पठाणकोट येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग! काय आहे कारण?

13 Jun 2025 14:01:29


चंदीगड : पंजाबमधील पठाणकोट येथे भारतीय हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. शुक्रवार, १३ जून रोजी पठाणकोटमधील नांगलपूर पोलिस स्टेशन हद्दीतील हलेड गावात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

मात्र, हे हेलिकॉप्टर अचानक का उतरवण्यात आले? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या हेलिकॉप्टरच्या लँडिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामीण भागात लोकांची गर्दी केली आहे. परंतू, या आपत्कालिन लँडिंगबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. तसेच यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

भीषण अपघातानंतर मृतदेहांची ओळखही पटवता येईना! डीएनए चाचणी करून मृतदेह नातेवाईंकांच्या ताब्यात देणार


गुरुवारी अहमदाबादमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने सगळीकडे हाहाकार माजला असताना आता पठाणकोट येथील हेलिकॉप्टरच्या आपत्कालिन लँडिंगची माहिती पुढे आल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Powered By Sangraha 9.0