’ऊत’ चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न

13 Jun 2025 22:05:44

मुंबई : तारुण्यात आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘वेरा फिल्म्स’ निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित ’ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पाहायला मिळणार असून, यासोबतच ’ऊत’मध्ये एक प्रेमकथाही आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही नवी जोडी मराठी रुपेरी पडद्यावर दाखल झाली आहे. या चित्रपटाचा शानदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच अभिनेते प्रसिद्ध मकरंद देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मंचावर चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

‘कान्स फेस्टिव्हल’मध्ये ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच अन्य देशी-विदेशी चित्रपट महोत्सवातही ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे.


Powered By Sangraha 9.0