पंतप्रधान मोदींनी घेतली माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची भेट!

13 Jun 2025 18:45:45



अहमदाबाद : अहमदाबाद विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, १३ जून रोजी घटनास्थळी जात पाहणी केली. दरम्यान, या अपघातात मृत्यूमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे.

या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते. या अपघातात त्यांना दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ते म्हणाले की, "विजयभाई आपल्यात नाहीत हे अकल्पनीय आहे. मी त्यांना अनेक दशकांपासून ओळखतो. आम्ही कठीण काळातही खांद्याला खांदा लावून एकत्र काम केले. विजयभाई नम्र आणि कष्टाळू होते, पक्षाच्या विचारसरणीशी दृढपणे वचनबद्ध होते. पदोन्नतीनंतर त्यांनी संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून परिश्रमपूर्वक काम केले."

...तर मी उद्धव ठाकरेंना भेटायला जाईल : मंत्री संजय शिरसाट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी अहमदाबादमधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये जात तिथे दाखल असलेल्या जखमींची भेट घेऊन चौकशी केली. यासोबतच या दुर्घटनेत बचावलेले एकमेव प्रवासी विश्वास कुमार यांचीदेखील मोदींनी भेट घेतली.




Powered By Sangraha 9.0