मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

13 Jun 2025 20:41:32

मुंबई, दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहितीसाठी मध्य रेल्वेचे जनतेला आवाहन केले आहे. सोमवार, दि.९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजताच्या सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे ८ जण त्यांचा तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून पडले. रेल्वे प्रशासनाने या घटनेचे कारण तपासण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याचसोबत प्रवासी जनता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही माहिती किंवा तपशील असेल त्यांनी लवकरात लवकर चौकशी समितीसमोर हजर व्हावे किंवा घटनेची माहिती ३ कामकाजाच्या दिवसांत मध्य रेल्वेच्या कार्यालयात पाठवावी. ओळखीच्या पुराव्यासह तपशील खाली दिलेल्या पत्त्यावर, मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

यासाठी वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी, एस. एस. सोनवणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, मुंबई विभाग, मध्य रेल्वे, अनुलग्नक इमारत, सीएसएमटी येथे माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबत srdsobbcr@gmail.com या मेल आयडीवरही प्रवासी ही माहिती देऊ शकतात. संबंधित दुर्घटनांचा क्रम ओळखण्यात आणि मूळ कारण शोधण्यात रेल्वेला मदत करण्यासाठी लोकांना माहिती स्वयंसेवा देण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यास मदत होईल, असेही मध्य रेल्वेने आवाहनात म्हटले आहे.





Powered By Sangraha 9.0