स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी – राहुल गांधींना संदर्भ पुस्तके सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश

13 Jun 2025 19:09:46

नवी दिल्ली,  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वापरलेल्या पुस्तकाची प्रत ३ जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश पुणे येथील विशेष आमदार-खासदार (एमपी-एमएलए) न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत.

राहुल गांधी यांची बाजू मांडणारे वकील मिलिंद पवार म्हणाले की, राहुल गांधी यांच्यातर्फे संक्षिप्त उत्तर दाखल करण्यात आले आहे. तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ९३ चा चुकीचा उल्लेख केला आहे. हा खटला सुरू करण्यात आला तेव्हा बीएनएसएस लागूही नव्हता. त्यामुळे तक्रारदाराने न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. अपरिहार्य परिस्थितीमुळे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी या प्रकरणात आपली बाजू मांडू शकले नाहीत. त्यांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला असून न्यायालयाने ३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.

तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी वकील संग्राम कोल्हटकर यांच्यातर्फे युक्तिवाद केला. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात ज्या पुस्तकाचा वापर केला होता, ते न्यायालयात सादर आवश्यक आहे. म्हणून, त्याची प्रत उपलब्ध करून देण्यात यावी.



Powered By Sangraha 9.0