इंदूर : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीसांनी उघड केलेल्या माहीतीत राजाची पत्नी आरोपी सोनमसह हत्येत सहभागी असलेले उर्वरीत आरोपींनी तीनदा राजाला संपवण्याचे प्रयत्न केले होते. या तीन्ही प्रकरणात आरोपींना यश आले नाही. मेघालयात हनिमून दरम्यान आरोपी पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी भाड्याने आणलेल्या तीन गुडांसह राजाची हत्या केली.
मेघालयात चौथ्या प्रयत्नात राजा रघुवंशी यांचा मृत्यू झाला, असे पोलिस अधीक्षक विवेक सायम यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले. हत्येचा पहिला प्रयत्न गुवाहाटीमध्ये करण्यात आला, त्यानंतर मेघालयातील सोहरामध्ये आणखी दोन प्रयत्न अयशस्वी झाले असे पोलिसांनी सांगितले. अखेर आरोपींनी राजाला वेइसावॉन्ग फॉल्सवर मारले, असे सायम म्हणाले. पहिल्या प्लॅननुसार, आरोपींना गुवाहाटीत राजाची हत्या करून मृतदेह दरीत टाकायचा होता पण तो फसला. त्यानंतर दुसऱ्यांदा नोंगरियातमध्ये राजाला संपवायचे होते पण आरोपींना मृतदेह टाकण्यासाठी जागा मिळाली नाही. तिसऱ्यांदा राजा वॉशरूमला गेल्यावर त्यांचा पुढचा प्लॅन होता. हे तिन्ही कट फसले आणि अखेर आरोपींनी राजाची वेइसावॉन्ग फॉल्स या ठिकाणी हत्या केली, असे सायम म्हणाले.
“सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. सोनमने तिचा हत्येतील सहभाग कबूल केला आहे. संपूर्ण हत्येचा कट इंदोरमध्ये करण्यात आला. राजाशी लग्न होण्यापूर्वीच सोनमकडून राजाच्या हत्येच प्लॅनींग करण्यात आल होत. यामागील सूत्रधार राज आणि सोनम यांनी या योजनेत सहभाग घेतला होता आणि भागीदार होते,” असे सायम म्हणाले. हत्या प्रकरणातील आकाश ठाकूर, आनंद कुर्मी आणि विशाल चौहान हे तिघेही मित्र आहेत. या सर्वांचा या हत्येच्या कटात सहभाग होता. राजा आणि सोनमच्या विवाहाच्या तीन महिन्यांपूर्वीच फेब्रुवारीत हत्येचा कट रचला होता, असेही तपासात उघड झाले आहे. हत्येतील पाचही आरोपींची चौकशी केली असता, राजा रघुवंशी हत्याप्रपकरणातील कटाचा मास्टरमाइंड राज कुशवाह असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.