भीषण आगीत अख्खं विमान जळून खाक, मात्र भगवद्गीता जशीच्या तशी सुरक्षित! साधा धक्काही लागला नाही

13 Jun 2025 16:18:43
 
Bhagavad Gita at Ahmedabad Plane Crash Site
 
गांधीनगर : (Bhagavad Gita at Ahmedabad Plane Crash Site) गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात एकूण २६५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यामध्ये २२९ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स आणि वसतीगृहातील २४ जणांचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की, प्रवाश्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. विमान पूर्णतः उद्धवस्त झाले. घटनास्थळी विमानाचे जळालेले अवशेष आणि लोकांचे मृतदेह विखुरलेले होते.
 
 हे वाचलंत का? -एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?
 
दुर्घटनेत सगळं जळून खाक पण भगवद्गीता सुखरुप
 
या भीषण अपघातादरम्यान अनेक चमत्कारिक गोष्टी आढळून आल्या आहेत. यातच बचावकार्यादरम्यान घटनास्थळी भगवद्गीता सापडली, जी विमानातील कोणा प्रवाशाची असण्याची शक्यता आहे. भीषण आगीत पूर्ण विमान जळून खाक झाले परंतु हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या भगवद्गीतेला धक्काही लागला नाही. इतक्या भीषण आगीत भगवद्गीतेच्या एकाही पानाचं नुकसान झालेलं नाही. खरंतर ही घटना कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुर्घटनास्थळावरील ढिगाऱ्याखालून काढलेल्या भगवद्गीतेची पानं दाखवत आहे. या आश्चर्यचकीत करणाऱ्या घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तेथील लोक याला चमत्कार मानत आहेत. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या आणि मदत कर्मचाऱ्यांनी हा केवळ योगायोग असू शकत नाही असे म्हटले आहे.
 
 
 
दुपारी १.४७ वाजता विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांनी हे विमान कोसळले. विमानतळाच्या सीमेजवळ असलेल्या मेघानी नगर येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या वसतीगृहावर हे विमान कोसळलं. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते. दुर्दैवाने त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0