गांधीनगर : गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताच्या घटनेने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनेने अनेक कुटुंबांना कधीही भरून न निघणारे घाव दिले आहेत. अमरेलीतील वाडिया येथील रहिवासी अर्जुन पटोलिया यांचे या अपघातात निधन झाले.
अर्जुन यांच्या पत्नी भारती यांचे सात दिवसांपूर्वी लंडनमध्ये निधन झाल्याने. पत्नीच्या इच्छेप्रमाणे आपल्या अस्थी अमरेली जिल्ह्यातील मुळ गावी नदीत विसर्जित केल्या जाव्या. यासाठी त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार अर्जुन गुजरातला आले होते. त्यांनी अमरेली येथे गावातील नातेवाईकांसोबत अंत्यसंस्कार विधी पूर्ण केले. आणि लंडनला परतत असताना विमान अपघातात अर्जून यांचा मृत्यू झाला.
दोन्ही मुले झाली अनाथ
अर्जुन यांना दोन मुले आहेत जी सध्या लंडनमध्ये आहेत. यात ८ वर्षीय आणि ४ वर्षीय अशा दोन मुलींचा समावेश आहे. आता या दोन्ही मुलींनी त्यांच्या आई आणि वडिलांना गमावले आहे. एअर इंडियाच्या एआय १७१ विमानाच्या अपघातात अर्जुनचे निधन झाले. विमान अपघाताची बातमी कळताच अर्जुनचे नातेवाईकांना धक्का बसला आहे.
समोर आलेल्या माहीतीतनुसार, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाची उंची वेगाने कमी होऊ लागली आणि लँडिंग गियर खाली उघडू लागला. वायरल झालेल्या फुटेजमध्ये विमान एका निवासी भागात पडताना दिसत आहे, ज्यामुळे या निवासी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते, ज्यात ५३ ब्रिटिश नागरिकांचा समावेश होता. या अपघातात फक्त एक व्यक्ती वाचली आहे. या घटनेले अनेक कुटूंबांना मोठा धक्का बसला.