ब्रेकिंग! अहमदाबाद विमान दुर्घटनेत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन

12 Jun 2025 16:59:32



गांधीनगर : अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे दु:खद निधन झाले आहे. गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-१७१ विमान कोसळून मोठा अपघात घडला असून विजय रुपाणी हेसुद्धा या विमानातून प्रवास करत होते.

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघानी नगर परिसरातील निवासी क्षेत्रात कोसळले. या विमानात २४२ प्रवाशी असून १२ क्रू मेंबर होते. दरम्यान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील या विमानातून प्रवास करत होते. त्यांचे विमानाचे तिकीटही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तसेच बोर्डींग पासमध्येसुद्धा त्यांचे नाव आले होते.

विद्यार्थी वसतीगृहात जेवत होते अन् अचानक विमान आत शिरलं! अहमदाबादमधील दुर्घटनेत काय घडलं?

दरम्यान, आता विजय रुपाणी यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. अहमदाबाद येथील विमान अपघातात विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांचा आकडा अद्याप पुढे आला नसून अपघातातील जखमींवर उपचार सुरु आहेत.
Powered By Sangraha 9.0