पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

12 Jun 2025 13:19:06

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Stone Pelting on Shiv Mandir) 
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.

हे वाचलंत का? : कुर्दीशांविरोधात जपानींचा आक्रोश

सदर घटना दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील महेशतळा भागात घडली. इथल्या स्थानिक हिंदूंच्या लक्षात आले की, जुन्या शिवमंदिराच्या परिसरात असलेल्या तलावावर हळूहळू भराव टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. या अतिक्रमणाबद्दल स्थानिकांनी तक्रार केली असता, प्रशासनाने देखील कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर जेव्हा काही इस्लाम समर्थकांनी मंदिर परिसरात दुकाने थाटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रोखल्यानंतर दोन गटांत वाद सुरु झाला. ज्याचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. यानंतर कट्टरपंथीय जमावाने मंदिर परिसराची तोडफोड केली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच जमावाने त्यांच्यावरही त्यावर दगड आणि विटा फेकल्या.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि अतिरिक्त पोलिस दल आणि आरएएफ घटनास्थळी पाठवण्यात आले. पण जमाव शांत झाला नाही आणि पोलिसांवर हल्ला करत राहिला. परिस्थिती बिघडत चालली आहे हे पाहून पोलिसांना काही काळासाठी माघार घ्यावी लागली. नंतर अधिक पोलिस दल आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणता आली.




Powered By Sangraha 9.0