रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जीत घराची तोडफोड; बांगलादेशात कट्टरपंथीचा हैदोस सुरूच!

12 Jun 2025 16:13:11

ढाका : (rabindranath tagore bangladesh house)
भारत व बांगलादेशच्या राष्ट्रगीताचे निर्माते नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर इस्लामिक कट्टरपंथींनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. बांगलादेशच्या सिराजगंज जिल्ह्यातील शहजादपूर भागात असलेल्या टागोर यांच्या कचरीबाडी या वडिलोपार्जीत घराची जमावाने तोडफोड केली. खिडक्यांच्या काचा फोडल्या, दरवाजे आणि फर्निचरचे मोठे नुकसान केले. सदर घटनेनंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती जागा बंद केली असून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

बांगलादेशात इस्लामिक कट्टरपंथींकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये त्या ठिकाणांना विशेषतः लक्ष्य केले जातेय, ज्यांचा कुठे ना कुठेतरी भारतीशी संबंध आहे. मोहम्मद युनूस सत्तेत आल्यानंतर या घटना सातत्याने घडत आहेत. स्थानिक माध्यमांनुसार, मोटारसायकल पार्किंग शुल्कावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. येथे आलेल्या काही लोकांचा स्थानिक कर्मचाऱ्यांशी वाद झाला आणि त्यानंतर प्रकरण चिघळले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्याप्रकरणी ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Powered By Sangraha 9.0