भारताला सक्षक्त बनविण्यासाठी इंडियात परत या- सरन्यायाधीश बी.आर. गवई
12 Jun 2025 18:25:10
ऑक्सफर्ड: इंग्लंड दौऱ्यावर असलेले सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी मंगळवार, दि.१० जून रोजी ऑक्सफर्डच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले की "भारताला तुमची गरज आहे, त्या गरजेला प्रतिसाद द्या," असे भावनात्मक आव्हान सरन्यायाधीश यांनी तेथील उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
या संवादात सरन्यायाधीश म्हणाले की तुम्हाला एकच आवाहन आहे की तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तुम्ही येथे राहू नका. भारतात परत या, आपला भारताला मजबूत आणि संपूर्ण जगातील सर्वात महत्वाच्या शक्तींपैकी एक बनवायचा आहे, त्यासाठी तुमची सेवा हवी. त्यांनी तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले की तुम्ही देशाचे भविष्य आहेत आणि देशाला तुमची गरज आहे.
पुढे सरन्यायाधीश म्हणाले की "ऑक्सफर्ड आणि केंब्रिजमध्ये अनेक माजी विद्यार्थी आहेत ज्यांनी देशाच्या विकासात योगदान दिले आहे, विविध विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटून मला खरोखर आनंद झाला. एका तरुणाने प्राचीन ग्रंथांमध्ये, धार्मिक संस्थांमध्ये आढळणाऱ्या समानतेवरील संशोधन सादर केले, अशी संकल्पना देखील अस्तित्वात आहे हे जाणून मला आश्चर्य वाटले. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की तुम्ही सर्वजण देशाचे भविष्य आहात आणि देशालाही तुमची गरज आहे."