शनि शिंगणापूरच्या पवित्रतेसाठी हिंदू समाजाचा १४ जूनला भव्य मोर्चा !

12 Jun 2025 15:38:08
 
march by the Hindu community on June 14 for the sanctity of Shani Shingnapur
 
मुंबई:  हिंदू समाजासाठी जागृत श्रद्धास्थान असलेल्या शनि शिंगणापूर मंदिरात ११८ जिहादी मानसिकतेच्या व्यक्तींना कामावर घेण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर येताच, संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरला आहे. या प्रकारामुळे शनि मंदिराच्या पावित्र्याला मोठा धक्का बसला असून, मंदिर व्यवस्थापनाच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
या पार्श्वभूमीवर १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता, शनि शिंगणापूर पोलिस ठाण्यापासून शनिदेव मंदिरापर्यंत भव्य हिंदू जनजागृती मोर्चा आयोजित करण्यात आले आहे. हजारो श्रद्धावान नागरिक, साधू-संत, माताभगिनी, युवक आणि समाजप्रेमी जनतेचा या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग होणार असून.या ऐक्य मोर्चाचे नेतृत्व आमदार संग्राम भैय्या जगताप, हिंदुत्ववादी युवा नेते सागर भैय्या बेग, आणि तुषार भोसले हे करणार आहेत. हिंदू समाजाच्या श्रद्धेच्या रक्षणासाठी आणि पवित्र स्थळांतील पारदर्शकतेसाठी हे आंदोलन ठोस भूमिका घेईल, असा निर्धार आंदोलन समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
 
या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर थेट आरोप ठेवत, त्यांच्या हस्तक्षेपामुळेच व्यवस्थापनाने ही वादग्रस्त भरती केली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे गडाख यांच्यासह संबंधित मंदिर पदाधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
 
“शनि शिंगणापूर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. येथे धर्मविरोधी विचारांच्या व्यक्तींची नियुक्ती होणे, हे मंदिराच्या शुद्धतेसाठी घातक आहे,” — असे मोर्चाच्या आयोजक कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले. हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्ती किंवा धर्माविरुद्ध नसून, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, पारंपरिक श्रद्धास्थानांची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी आहे. “हे केवळ आंदोलन नसून, हिंदू समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतिक आहे,” असे मोर्चाचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे .  या पवित्र लढ्यासाठी अहिल्यनगर जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधवांना मोठ्या संख्येने १४ जून रोजी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रद्धेच्या रक्षणासाठी हिंदू समाजाची एकजूट आणि सजगता या आंदोलनाच्या माध्यमातून ठळकपणे दिसून येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0