बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी दोषीना कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला अंतरिम जामीन!

12 Jun 2025 19:41:29

बंगळुरू(Bengaluru stampede): आयपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या दोषीना ६ जून रोजी अटक केली होती, त्यात मुख्यत: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएशी संबंधित तीन जण होते. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवार, दि. १२ जून रोजी या सर्वाना अंतरिम जामीन मंजूर केला.

न्यायमूर्ती एसआर कृष्ण कुमार यांचा खंडपीठाने म्हटले की, चेंगराचेंगरीला कारणीभूत ठरलेल्या घटनांमध्ये त्यांचा वैयक्तिक सहभाग सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नसल्यास अटक केलेल्या व्यक्तींना तुरुंगात ठेवता येणार नाही.
न्यायालयाने याचिकेला उत्तर देत म्हटले की "आरसीबी आणि डीएनएचे अधिकारी किंवा कर्मचारी किंवा संचालक असलेल्या याचिकाकर्त्यांची तुलना या कंपन्यांशी करता येणार नाही आणि त्यांच्या अटकेपूर्वी या घटनेत त्यांचा सहभाग आणि सहभाग सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नसल्यास, याचिकाकर्त्यांना कथित गुन्ह्यांसाठी जबाबदार धरता येणार नाही.”

याचिकाकर्त्यांना अंतरिम जामीन न्यायालयाने काही अटीवर मंजूर केला, त्या अशा की, त्यांनी चौकशीत सहकार्य करावे, कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड करू नये आणि दोन जामीनदारांसह १ लाख रुपयांचा वैयक्तिक जामीनीची रक्कम भरावी.याशिवाय, याचिकाकर्त्यांनी दोन आठवड्यांच्या आत त्यांचे पासपोर्ट ट्रायल कोर्टात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यांना न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय भारत सोडू नये असे देखील आदेश देण्यात आले.

या खटल्यात आरसीबी आणि निखिल सोसाळे यांची बाजू वरिष्ठ वकील सी.के. नंदकुमार यांनी मांडली.




Powered By Sangraha 9.0