मुंबई(Ban on TikTok): राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टिकटॉक अॅपवर ऑक्टोबंर २०२३ मध्ये बंदी घातली होती. ट्रेड मार्क्स रजिस्ट्रारने ट्रेड मार्क्स नियम, २०१७ च्या नियम १२४ अंतर्गत ‘सुप्रसिद्ध’(Well-Known) ट्रेडमार्कच्या यादीत टिकटॉकचा समावेश करण्यास नकार दिल्याने,टिकटॉक लिमिटेडने एका याचिकेव्दारे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
टिकटॉकने ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी नियम १२४ अंतर्गत सुप्रसिद्ध ट्रेडमार्कच्या यादीत समाविष्ट करण्यासाठीचा अर्ज केला होता जो की ट्रेड मार्क्स रजिस्ट्रारने टिकटॉक अॅपवर बंदी असल्यामुळे नाकारला होता. टिकटॉक हा भारतात आधीच नोंदणीकृत ब्रँड आहे.
न्यायाधीश मनीष पितळे यांच्या खंडपीठाने या याचिकेला उत्तर देताना म्हटले की, भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला, संरक्षणाला आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला, ज्या बाबी धोका निर्माण करतात, त्याला बंद करणे हा सरकारचा सर्वेस्व अधिकार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टिकटॉक अॅपवर लादलेली बंदी ही योग आहे म्हणत, बंदी उठवण्यास न्यायालयाने नकार दिला.