कराड, “महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरे यांनी केली आणि त्याचे मूळ संजय राऊत आहेत. त्यांना ‘बेईमान ऑफ द महाराष्ट्र’ हा किताब द्यावा लागेल,” अशी घणाघाती टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवार, दि. १२ जून रोजी केली केली. आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत, “स्वार्थासाठी हजारो झाडांची कत्तल करणाऱ्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,” असे ते म्हणाले.
कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले आणि प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यावेळी उपस्थित होते. शेलार म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री असताना मुंबईत दरवर्षी ६ ते ७ हजार झाडांची कत्तल केली. विकासकांना फायदा व्हावा म्हणून ही वृक्षतोड झाली. अशांना पर्यावरणावर बोलण्याचा अधिकार नाही”, असेही त्यांनी सांगितले.