अहमदाबाद विमान दुर्घटना : माजी मुख्यमंत्री विजय रुपानी विमानात प्रवास करत असल्याची माहिती

12 Jun 2025 15:23:05


गांधीनंगर :
अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची दुर्घटना घडली असून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हेदेखील या विमानातून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.

गुरुवार, १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. मेघानी नगर परिसरातील निवासी क्षेत्रात २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरु असून अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच विमान कोसळले. AI-१७१ विमानात २४२ लोक असून त्यात २ वैमानिक आणि १० क्रू मेंबर होते होते.

राज ठाकरे-फडणवीसांच्या भेटीनंतर मनसे नेते मंत्री उदय सामंतांच्या भेटीला! काय घडलं?

माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हेदेखील या विमानातून प्रवास करत असल्याची माहिती आहे. त्यांचे विमानाचे तिकीटही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विमान खाली कोसळताच संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उडाले होते. या अपघाताचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Powered By Sangraha 9.0