जगातील हिंदू आणि ख्रिश्चनपेक्षा मुस्लिमांच्या संख्येत वेगाने वाढ

12 Jun 2025 12:41:56

The number of Muslims in world is growing faster than Hindus and Christians 
 
नवी दिल्ली :‘प्यू रिसर्च सेंटर’च्या नवीन अंदाजानुसार 2020 पर्यंतच्या दशकात मुस्लिमांची लोकसंख्या इतर कोणत्याही प्रमुख धार्मिक गटांपेक्षा वेगाने वाढली आहे. ख्रिश्चनांनंतर मुस्लीम जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा धार्मिक गट ठरला आहे.
‘प्यू’ अहवालानुसार, 2010 ते 2020 पर्यंत मुस्लिमांची संख्या 347 दशलक्ष लोकांनी वाढून 2.0 अब्ज झाली आहे. त्याचवेळी ख्रिश्चन समुदाय हा जगातील सर्वात मोठा धार्मिक गट बनला आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांची लोकसंख्या 12.2 कोटींनी वाढून 229 कोटी झाली आहे. असे असले तरीही, ख्रिश्चन समुदायाचा जागतिक वाटा 30 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर आला आहे.
 
‘प्यू’च्या संशोधनात अन्य धर्मांची माहितीदेखील आहे. बौद्ध धर्माचे पालन करणार्‍या लोकांची संख्या 1.9 कोटींनी कमी होऊन 32.4 कोटी झाली आहे आणि त्यांचा जागतिक वाटा पाच टक्क्यांवरून फक्त 4.2 टक्के झाला आहे. याशिवाय, ज्यू समुदाय हा जगातील सर्वात लहान धार्मिक लोकसंख्या आहे, ज्यांची लोकसंख्या 1.4 वरून 1.5 कोटी झाली आहे. ज्यू समुदायाचा जागतिक वाटा केवळ 0.2 टक्के आहे. दुसरीकडे, शीख, जैन आणि बहाई समुदायासारख्या इतर धर्मांची लोकसंख्या 1.8 कोटींवरून 17.2 कोटी झाली आहे. त्यांचा जागतिक वाटा 2.2 टक्के आहे.
 
हिंदूंची टक्केवारी स्थिर
 
गेल्या दहा वर्षांत हिंदू लोकसंख्येत वाढ झाली आहे. हिंदूंचा जागतिक वाटा 15 टक्के दराने स्थिर राहिला आहे.
 
2010-2020 दरम्यान हिंदूंची जागतिक लोकसंख्या 12.6 कोटींनी वाढून 115.8 कोटी झाली
 
मुस्लीम लोकसंख्यावाढीमागे नेमकी कारणे काय
 
मुस्लिमांना इतर कोणत्याही प्रमुख धर्माच्या सदस्यांपेक्षा सरासरी जास्त मुले आहेत आणि ते तरुण आहेत.
 
2015-2020च्या आकडेवारीनुसार, एका मुस्लीम महिलेला तिच्या आयुष्यात सरासरी 2.9 मुले असतील, तर प्रतिबिगर मुस्लीम महिलेला 2.2 मुले आहेत.
 
2020 मध्ये मुस्लिमांचे जागतिक सरासरी वय बिगर मुस्लीम सरासरीपेक्षा नऊ वर्षे कमी होते. जागतिक स्तरावर, मुस्लीम लोकसंख्येतील बदलाचा धर्मांतरित होण्याशी फारसा संबंध नाही.
 
2008 ते 2024 पर्यंत 117 देश आणि प्रदेशांमध्ये गोळा केलेल्या सर्वेक्षण आकडेवारीच्या आधारे, मुस्लीम म्हणून वाढलेले सुमारे एक टक्का लोक धर्म सोडतात. मात्र, हे नुकसान इस्लाममध्ये सामील होणार्‍या लोकांच्या मोठ्या संख्येने भरून निघते.
 
Powered By Sangraha 9.0